बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता अभियान .
वसमत : येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्रांगणात एक तास स्वच्छता श्रमदान मोहीम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने विभागीय आयुक्त कार्यालयाचे संपर्क अधिकारी उप आयुक्त सुरेश बेदमुथा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत एक तास श्रमदान राबविण्या बाबत सुचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने दि 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ करुणा देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एक तास स्वच्छता श्रमदान केले . या मोहिमेत सहभाग नोंदवला उपस्थीत सर्वांनी परीसरातील सर्व केर कचरा गवत स्वच्छ करत कार्यालयीन स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यात आली . या वेळी नॅकचे डॉ नरसिंग पिंपरणे, डॉ एस एस भालेराव, डॉ सोनाजी पतंगे , प्रा प्रदिप डोंगरकखेडकर, प्रा सवंडकर, निलेश देशमुख , देमाजी फोपसे, शंकर शिंदे, दिपक शिंदे यांच्या सह प्राध्यापक , प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अभियानात सहभागी झाले होते .
2023-10-04