Carrier Guidance and Placement cell समिती तर्फे आयोजित Axis Bank, sales Executive मुलाखतींचे क्षणचित्रे….5/10/2023

आज दिनांक 5/10/2023 रोज गुरुवारी महाविद्यालयात, Carrier Guidance and Placement cell समिती तर्फे आयोजित Axis Bank, sales Executive मुलाखतींचे क्षणचित्रे….
या कार्यक्रमासाठी Axis bank, Basmath branch चे व्यवस्थापक, श्री निलेश वट्टमवार साहेब, नांदेड येथील रिजनल मॅनेजर श्री पटाईत साहेब, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ करुणा देशमुख यांच्या सह संयोजक प्रा डॉ ए. बी. मुगुटकर व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ करुणा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी हि एक संधी चालून आली आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री पटाईत साहेब यांनी सध्याच्या बदलणार्‍या काळात बॅंका कुशल मनुष्यबळाचा शोधात तुमच्या महाविद्यालयात येत आहेत कारण येथे आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध असुन येथील विद्यार्थ्यी नौकरी साठी सर्व द्रष्टीने तयार झालेले दिसत आहेत असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी केले. विद्यार्थ्यी व बॅंक यांच्या मध्ये दुवा म्हणून हि समिती कामकाज करीत असल्याचे प्रतिपादन केले. आभार प्रदर्शन प्रा अभय मोताफळे यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *